जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना पुढे आकाशवाणीवरील अन्य कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या सर्व अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. नवीन ओळखी झाल्या. अशीच ओळख आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे याच्याशी आकाशवाणीवरच झाली. एका ऑडिशनसाठी आम्ही आकाशवाणीवरच भेटलो. ओळख झाली. मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये होतो. आमच्याकडे तेव्हा सर्क्युलेशन/ जाहिरात विभागात एक्झिक्युटीव्हच्या काही जागा भरायच्या होत्या. शिवाजी धुरी हे प्रमुख होते. आकाशवाणीच्या भेटीत राजेशशी गप्पा मारताना तो नोकरीच्या शोधात असल्याचे कळले होते. मी ...