माझी ब्लॉग शाळा ! येथे हे वाचायला मिळाले:
या सर्व प्रकारामधे कुठून आणि कशी सुरुवात करायची हे जरी माहीत नसले तरी काही हरकत नाही. माझा हा मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हाच तर एकमेव उद्देश आहे. मराठी तरुणाई जी आज आपली स्वत:ची अशी एक जागा तयार करण्यास धडपडत आहे. त्यांच्यासाठी तर ब्लॉग हे खरोखर खुप मोठे वरदान आहे. कदाचित हे सर्व वाचून मी अतीशयोक्तिपुर्ण विधाने करीत आहे असेच प्रत्येकाला वाटेल. परंतु म्हणतात ना की, स्वानुभव हाच खरा शिक्षक असतो! तसेच आहे हे!