चौकस
पुन्हा एक अप्रतिम कथा... उत्तम वातावरण निर्मिती, अतिशय अनुभवी नजरेने टिपलेले बारकावे आणि अतिशय अचूक, तरल मनुष्य स्वभावाचे चित्रण.....
"खाली अंगणात उतरणाऱ्या पायऱ्या पावसाच्या संततधारेने बुळबुळीत झाल्या होत्या. पायऱ्यांच्या पातळीत मन मानेल तसा फरक पडत गेला होता"................... तुम्ही कोकणात अनेक दिवस राहीला आहात का?
"सायीखालचे दूध नासावे तसे ओल्या हिरव्या वासाच्या पांघरुणाखाली दडलेल्या त्या घरातले आकाश नासून गेले."................ असल्या उपमांनी आमचे तर अगदी मन भारून गेल्या सारखे वाटते... वाक्यावाक्यांमधून असा निखळ, लख्ख आनंद आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आभार!