उबुंटूवर जाणवणारी आणखी एक अडचण म्हणजे घरंगळलेले अनुस्वार व रफार. उदा. विडंबन हा शब्द विंडबन असा दिसणे. अर्थात हे सर्वच शब्दांच्या बाबतीत होत नाही.

मात्र ही अडचण फाँटाशी निगडीत असावी असे वाटते. सीडॅकऱ्योगेश वापरला असता विंडबन असे दिसते. मात्र इतर फाँट वापरल्यास (अक्षर श्रीधर वगैरे) तर अक्षरे व्यवस्थित दिसतात. त्यामुळे 'विंडबन' ही अडचण चालकप्रणालीमुळे नसावी.