प्रश्न : एव्हढ्या सगळ्यातून निराकार असण्याचे, किंवा तो नसल्यामुळे नसण्याचे, प्रयोजन काय हे अजूनही कळाले नाही.

उत्तर : तुला चित्र काढायचे असेल तर कॅनव्हास शिवाय जमेल का? चित्र काढल्यावर अशी कोणती जागा असेल जिथे कॅन्व्हास नसेल? हे जर तुला कळले असेल तर पुढचे फार सोपे आहे. समजा नृत्य करायचे असेल तर काय लागेल? निराकार! या जगातली प्रत्येक वस्तू त्रिमीती आहे त्यामुळे तो प्रत्येक आकाराचा आधार आहे. आपण दखल घेत नाही म्हणून तो जाणवत नाही. जर सगळ्याच्या आत बाहेर तोच आहे तर ज्याला तो कळला त्याला हे देखील त्याच क्षणी कळते की आपण आणि तो एकच आहोत. मग मृत्यू शांत झोपे सारखा वाटतो कारण तो फक्त आकार पुसून टाकतो, आपण तसेच राहतो.                        संजय