७० वर्षे वया खालील सर्वांसाठी मतदान सक्तीचे असलेच पाहिजे. आय सी यु मधले पेशंट या सारख्या व्यक्तींना यातून सूट दिली पाहिजे. मतदान न करणाऱ्या व्यक्तींना रु. १०० दंड, वा काही तास साधा कारावास वा तत्सम दंड आकारला पाहिजे. लोकशाहीत सुद्धा अनेक कर्तव्ये अनिवार्य असली पाहिजेत.
त्या साठी त्या दर्जाची यंत्रणा, जसे रेल्वे/ बसस्थानकावर तत्सम ठिकाणी मतदान केंद्रे, मतदारांची बायोमेट्रीक माहिती [ डेटा - बेस ], प्रत्यक्ष मतदानाला लागणारा न्युनतम वेळ, एकाच वेळी अनेकांना [उदाः १०००/ २००० जणांना] मतदान करता येण्याजोगी यंत्रे, अशी संसाधने निर्माण करण्यात यावीत.
यात मतदानासाठीच्या रांगांचे उन्मूलन खूप आवश्यक आहे.
मग आपसूकच अनेक चांगले बदल घडून येतील.
धन्यवाद.