काही शेर उत्तम आहेत-

कुठे म्हणालो मना, अशी चालना असावी?
हयात आहोत एवढी भावना असावी

अजूनही पाहुनी तुला राख लाल होते
कुठेतरी या मनातही चेतना असावी

जगून गेलो मध्येच मी जिंदगी इथे ही
कवी पुन्हा खोडतो तशी कल्पना असावी

'ठाक' असे लिहायला हवे.

लहान मोठ्या बऱ्याच आल्या, पसार झाल्या
जगायला एक चांगली यातना असावी
हा आणि वल्गनेचा शेर भरतीचा वाटला.

एकंदर 'इफेक्ट' चांगला.