हा लेख म्हणजे एक स्काय शॉट आहे. एका बाणातून अनेक ताराफुलं पडतात तसा. फारच सुंदर.
आणि सचिन पासून ते थेट फेडरर - नडालपर्यंत ( मला फेडरर - नडाल दोघांचाही खेळ प्रचंड आवडतो त्यामुळे कोणीही हरलं तरी दुःख मलाच होतं ) सगळेच प्रचंड जिव्हाळ्याचे विषय असल्यामुळे लेख मनाला जाऊन भिडला.
या चुरशी, ईर्ष्या, अहमहमिका आणि खुन्नशी(! ) यांच्यामुळेच तर खेळ बघायला मजा येते. प्रतिस्पर्ध्याच्या गुंणांबद्दल असलेला आदर आणि त्याच्याशी असलेली मोकळी मैत्री हीच या चुरशीमागची खरी ताकद असते आणि ती तशीच असायला हवी हे मत अगदी मनापासून पटलं.
फारच छान.
--अदिती