१. देशाप्रती " देवाण" जास्तीत जास्त " स्पॉट" / ' तात्कालीक करण्यासाठी. [ वायदा कर्तव्ये मोडीत काढण्यासाठी]

भारतीय घटनेच्या चौकटीमध्ये दान/देवाण तात्कालिक करण्याचे बंधन घालणे सक्तीचे नाहि. मी एक सुजाण नागरीक या नात्याने घटना प्रमाण मानतो. 

२. देशाने, संविधानाने,  नेतानिवडीचा दिलेला अधिकार वाया घालून देशाच्या व स्वविकासाच्या प्रती कर्तव्यच्युती टाळण्यासाठी.

माझा विकास कसा करायचा हे मी जाणतो. मतदान केल्याने स्वविकास होत नाही असे माझे मत असेल तर? मतदानाने स्वविकास होतो हा तुमचा हट्ट मत माझ्यावर का बरे मारावे?

३. जाणतेअजाणतेपणे, तटस्थ राहून, अप्रत्यक्षपणे, लोकशाही असमर्थक वा विरोधींना मदत होउ नये यासाठी.

जर मी मतदान केल्याने या देशविघातक शक्तींना बल मिळणार असेल तर?

४. देशाचा नागरीक म्हणून उपभोगलेल्या हक्कांमुळे सार्वजनीक संसाधनांवर पडलेल्या  " बोजा" प्रती, कृतीशील परतफेडीसाठी.

मी मत दिल्याने सार्वजनीक संसाधनांवर पडलेल्या  " बोजा" ची परतफेड कशी काय बॉ होते?? नीट विस्कटून सांगावे. या दोन गोष्टींचा काही अन्योन्य संबंध कळला नाहि.

५. लोकशाही प्रक्रियांमध्ये सामील होउन " एकसंघता" वाढीस लागण्यासाठी.

इच्छेविरुद्ध केलेल्या सक्तीने एकसंघता वाढेल?

६. ज्या देशात सार्वजनीक ठिकाणी, नैसर्गीकविधी करून तिथली स्वच्छता / निर्जंतुकता अबाधीत ठेवणे, सुदृढ माणसाला सुद्धा ऐच्छिक असावे असे वाटते, अशा स्तरावरील समाजघटकांना राष्ट्रिय स्तरावरील प्रक्रियांमध्ये सहभागी करून त्याचे "शिस्तबद्ध सक्षमीकरण" करण्यासाठी. [ परस्पर / अन्योन्य समन्वयाने प्रगती--- या तत्त्वाच्या अनुसरणाने]

तुम्ही म्हणता ते घटक तसेही मतदान करतातच. प्रश्न आहे तो संकेतस्थळांवर नुसती वाफ दवडून मतदान न करणाऱ्यांचा नाहि का?

थोडक्यात माझे मतः मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्या आहे आणि त्याचे स्वेच्छेने पालन करावे. मात्र कोणी सक्ती केली तर लोकशाही मध्ये ते योग्य नाहि

(आक्रस्ताळ्या भुमिका न घेऊ इच्छिणारा सुजाण नागरीक) ऋषिकेश