गझलेशिवाय इतर कवितेत रदीफ असू नये असा काही नियम आहे का? कित्येक हिंदी गाण्यांत गझल नसताना काफिया रदीफ ही यमके असतात.

उदा.

प्यार मुहब्बतकी हवा पहले चलती है
फिर एक लट इन्कारकी रुखपे ढलती है

लटे चेहरेसे सरका दो तमन्ना आँखें मलती है

(मेरेसनम मधील हमदम मेरे हे गाणे. येथे मागे टवाळांनी भाषांतर टाकले होते ते पाहा.) अशी खूप उदाहरणे मिळतील.

येथे है हा रदीफ आहे अलती है हा काफिया आहे. आणि ही गझल नाही.

मला वाटते काफिया रदीफ हा यमक प्रकार फारसी कवितेचा गुणधर्म आहे.

तुमच्या कवितेत आस हा काफिया आणि कविते, शून्य मी अन शून्य तू हा रदीफ आहे असे मला वाटते.