ही स्पर्धा " स्टार वॉर्स " सारखी जिवघेणी नसावी. तर शुद्ध व्यावसायीक, कौशल्ये पणाला लावणारी, निसटते वा निर्णायक विजय मिळवून देणारी, दुसऱ्याला न्यून न दाखवता स्वतःचे "निर्विवाद वर्चस्व " सिद्ध करणारी अश्याच खुन्नशी, आपल्यासारख्या प्रेक्षकांना एक क्षणीक "झिंग" देऊन जातात.
के. श्रीकांत वि. मार्शल , सचिन वि. अब्दूल कादिर, गावस्कर वि. ईम्रान , संदीप पाटील वि. बॉब विलीस,
इव्हान लेंडल वि. बोरीस बेकर, मार्टिना वि. ख्रीस एव्हर्ट, जीम कुरीयर वि. पिट सँप्रास, हॉकीत जर्मनी वि. ऑस्ट्रेलिया.
अशी व्यावसायीक खुन्नशीची, पण तितक्याच असलेल्या अन्योन्य / परस्पर आदराची अनेक उदाहरणे देता येतील.
"खेळ - मुत्सद्देगीरी" च्या चलनाने, कित्येक देशांतली खरी-खुरी खुन्नस संपुष्टांत आणली असेल.
धन्यवाद, जे पी मॉर्गन जी. स्मृतीपटलातल्या संस्मरणीय आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.