रदीफ कवितेत जरूर असावी. ( वृत्तबद्धता, अलामत, काफिया वगैरे नियमही पाळलेले असावेत. )

माझे मत असे आहे की:

गजलेकडे पाहताना आपण खालील निकष मनात ठेवले पाहिजेतः

१. तंत्र

२. प्रत्येक द्विपदी अर्थाच्या बाबतीत स्वतंत्र.

३. साधारणपणे प्रवृत्ती समांतर असलेल्या द्विपदी

४. आशय - हा कसा असावा यावर मतभिन्नता असेल.

या निकषांमुळे आपोआपच रदीफ ही एक अशी बाब बनते की तिला तिच्या अर्थासहीत काफियाबरोबर व शेरामध्ये बेमालूम, खरे तर बेमालूम नाहीच, नैसगीकपणे बसली पाहिजे.

कवितेकडे पाहताना वरीलपैकी ( जर वृत्तबद्ध कविता असेल तर ) फक्त तंत्र हाच एक निकष लावणे योग्य असावे.

अश्या रचनेमधे.. 'कविते, शून्य मी अन शून्य तू' हा शब्दसमूह फक्त एका व्यथेचे व्यक्तीकरण, तेही एखाद्या ध्रूपदासारखे करत आहे.

म्हणजे, एखादा प्रसंग / अनुभव / व्यथा मांडताना गजलेत रदीफ जशी होमोजिनियसली मिसळते तशी कवितेत ती मिसळावीच असा आग्रह असेल तर, मुळात येथील ९९% कवितांमधून ४०% अनावश्यक बाबी मी दाखवू शकेन. जर कविताच इतकी बंदिसत हवी असेल तर अर्थातच मी देऊ शकेन, पण मग हीच अपेक्षा याच कवितेकडून का?

( तसेच, कुठल्याही कवितेला 'रदीफ' असते हे आपले मत ठीक आहे, पण फरफट झाली आहे याबाबत आपेल मत समजले नाही. )

धन्यवाद!