अगदीच सगळे सामाजिक शेर आले की गझलियतची उणीव जाणवणे सहज शक्य होते.
म्हणजे? चंद्रचादण्या, तारका, फुले असले की गझलियतची उणीव जाणवणे सहज अशक्य होते काय? गझलियत म्हणजे बोलकेपणा, प्रासादिकता, वगैरे वगैरे. तिचा शेराच्या सामाजिक असण्यानसण्याशी काही संबंध नाही असे मला वाटते.
उदा.
बांधतो आहे बुटाचे बंध मी
फाटक्या चपलेत आई चालली
--- गणेश धामोडकर
ह्या द्विपदीत मला गझलियतची उणीव अजिबात जाणवत नाही. नवे सिद्धांतबिद्धांत जरा जपून मांडायला हवे.