सविस्तर लिहिलेल्या सूचना/ कल्पना आवडल्या.
१५/ १६ वर्षांपूर्वी मी अकरावीला प्रवेश घेतला तेव्हा कुठेही रांगेत उभे राहण्याची वेळ आली नव्हती. थेट जाऊन अर्ज घेऊन आले व तसाच तो भरूनही आले होते. बहुतेक साताऱ्यासारखे छोटे शहर असल्याचा फायदा झाला.
चार चाकी गाड्या लावण्याची पुरेशी सोय महाविद्यालयात असेल असे वाटत नाही. आणि इतर सूचनांच्या मानाने या गोष्टीची सोय करणे शक्य होईल असे वाटत नाही. खरे म्हणजे, पालकांनी प्रत्येक ठिकाणी जाणे गरजेचे आहे का, असा मला प्रश्न पडला आहे. १६ वर्षांची मुले ही कामे आपापलीच करू शकतील, नाही का?