मनापासून दिलगीर आहे की आपला रसभंग झाला.

श्वासींधनी सीमा - श्वासांचे इंधन आहे तो पर्यंत जीव आहे, या सीमेत मी आहे. कविता ही एक अक्षरांची बेडी आहे. दोघांनाही मर्यादा व सीमा आहेत. सगळा आनंदच आहे. म्हणून : सर्वथा उल्हास कविते.. शून्य मी अन शून्य तू!

पौरुषाचा ऱ्हास - दिवसा या दुनियेला सहन करून रात्री ते कवितेत मांडत बसल्यावर मानवाचे जे प्रथम नैसर्गीक कर्तव्य मानले जाऊ शकेल ते तो करणार कधी? कारण तो सारखा कविताच करत बसणार! अश्याने त्यातील पौरुषत्व हळू हळू नष्टच व्हायचे!

निर्विरोधी गुंतणे - प्रेयसी सुरुवातीला लाजते, नंतर प्रेमाची मागणी स्वीकारते व त्यानंतर बिनविरोध दोन आत्मे एकमेकांमध्ये गुंततात. पण कवितेच्या लाजण्यात ( न सुचण्यात ), स्वीकारण्यात ( सुचण्यात ) व निर्विरोधी गुंतण्यात ( कायमचे एकमेकांचे होण्यात ) खरे तर प्रणयाचे नुसते भास आहेत. तो आहे एक त्रास! कविता सुचली नाही तरी त्रास अन सुचली तरी त्रास!

व्यर्थ मैदानात ठरली छंद माधुर्ये तुझी - वास्तव जगात जगताना कवितेच्या मधुर गुणांचा मला कधीही फायदा झाला नाही. उलट साऱ्या जगाने निंदा तरी केली किंवा माझाच फायदा तरी घेतला. तसेच, आयुष्यातील दुःखांशी लढताना नुसत्या कविता सुचून काही बळ आले नाही. अश्या अर्थाची ही द्विपदी होती.

( कवितेचा अर्थ सांगावा लागणे हे कवीसाठी दुर्दैवी आहे. मला तो अनेकदा सांगावा लागतो यावरून मी कसा कवी आहे हे स्पष्ट होतच आहे. असो. आपल्या प्रतिसादामुळे मला बरे वाटले. )