हजारो ख्वाहिशे ऐसी ही गजल बऱ्याच अंशी उपहासावर विसंबूनच आहे.
१. खुदाके वास्ते परदा न काबेसे उठा जाहिद
२. कोई लिखवाये उसको खत
३. भरम खुलजाये जालिम
४. डरे क्यों मेरा कातिल
५. हुई जिनसे तवक्को
६. मोहोब्बतमे नही है फर्क
७. जरा कर जोर सीनेपर
या बहुतेक शेरांमध्ये टीका, उपहास ओथंबून वाहत आहे.
'आदम' या शेरावरून आपला असा ग्रह झालेला दिसत आहे की गालिबला प्रेयसीने हाकलून दिल्याची व्यथा आहे. आयुष्यभर आपल्या शायरीत विरहावर प्रेम करणारा, त्यातून सर्वव्यापी परमात्म्याशी संधान साधू पाहणारा व त्याचा जवळजवळ पायंडा पाडणारा कवी असे शेर फक्त प्रेयसीला उद्देशून करत असेल असे कृपया वाटत असल्यास वाटून घेऊ नयेत.
धन्यवाद!