हजारो ख्वाहिशे ऐसी ही गजल बऱ्याच अंशी उपहासावर विसंबूनच आहे.
हीच कविता कशाला. असा नर्मविनोद, त्यातही स्वतःला बोचकारणारा विनोद, उपहास गालिबकडे सर्वत्र, जागोजागी दिसतो.  प्रेमाच्या 'शायरी'त, विरहाच्या 'शायरी'त. मुख्य म्हणजे अगदी उपहासाच्या 'शायरी'तदेखील. तो गालिबचा स्थायीभावच आहे.

आयुष्यभर आपल्या शायरीत विरहावर प्रेम करणारा
हे जवळपास सगळ्याच "शायर" लोकांना लागू होईल. त्यात खास, वेगळे ते काय?

त्यातून सर्वव्यापी परमात्म्याशी संधान साधू पाहणारा
  गालिबने एका पत्रात कवितेत आध्यात्म, तसव्वुफ (सूफीचे आध्यात्म ते तसव्वुफ) रुचिपालटापुरते असल्यास बरे (म्हणजे खूप नको)  असे काहीसे म्हटलेले आहे. तो काही ख्वाजा मीर दर्द नव्हता. रमजानच्या महिन्यातदेखील मद्यपान करणारा गालिब तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमात्माबिरमात्म्याशी संधान साधू पाहात असेल असे वाटत नाही. असो. पटले तर घ्या. नाहीतर सोडून द्या.

१. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार उर्दूतला कवी ख्वाजा मीर दर्द हा खऱ्या अर्थाने सूफी कवी होता.
त्याच्या काही द्विपदी--

है ग़लत गर गुमान में कुछ है

तुझसिवा भी जहान में कुछ है

इन दिनों कुछ अजब है हाल मेरा
देखता कुछ हूँ, ध्यान में कुछ है

दिल ये तेरेही ढंग सीखा है
आन में कुछ है आन में कुछ है

इथे आन म्हणजे क्षण. आन-बान-शान में मधले आन नाही बरं का.