खरे तर आपल्या मुद्यांचा व माहितीचा पूर्ण आदर आहे. आणखीन काही म्हणावेत म्हणून माझ्या काही समजुती खाली देत आहे. त्याला कृपया 'वाद घालणे' समजू नयेत.
माझ्यामते रोजे न पाळता उलट त्या काळात मद्यपान करणारा गालिब हा खरे तर जास्त आध्यात्मिक मानला जावा. तसा तो बहुधा त्याच्या मृत्यूनंतर मानला गेला आहे. त्याने एका विशिष्ट संकल्पनेला ईश्वर न मानता माणुसकीला महत्त्व दिलेले दिसते. आपण म्हणता तशी मिष्किल शैली सर्वत्र आहेच. परंतु 'खुदाके वास्ते परदा न काबेसे' या किंवा नक्श फरियादी है किसकी शोखी ए ' सारख्या शेरांमधून तो भौतिक विचार मांडलेत असे दाखवून कुठल्यातरी गूढ विषयांवर बोलतो असे माझे मत झाले आहे. आपले मत समजल्यास मला माझा दृष्टीकोन ठरवण्यास मदत होईल.
तसेच ख्वाजा मीर दर्द यांच्या 'अगर यूंही ये दिल सताता रहेगा' किंवा 'मेरा जी है जबतक तेरी जुस्तजू है' सारख्या गजलांमध्ये ऐहिकता ही 'संत-विचारांचा' समावेश न करून घेता एकटीच स्पष्टपणे समोर येताना दिसते असे माझे मत आहे.
मूळ विषय - एकाच गजलेतील शेरांमध्ये 'शायराची भिन्न भिन्न मनस्थिती फार कमी दिसून येते' असे मला म्हणायचे होते व त्यामुळे रसभंग होत नाही असेही म्हणायचे होते.
नाराज होऊ नयेत अशी इच्छा!