लेख अगदी चटपटीत झाले आहे. तुमचे उत्कट भेळप्रेम बघून भडभडून आले. आपल्या जातीचे कुणीतरी मिळाल्याचा, भेटल्याचा आनंद झाला.
इतर वेळेस भल्याभल्यांना रडवणाऱ्या कांद्याचा भय्याच्या हातात मात्र सपशेल पांढरा बावटा!
हाहाहा. कांदा छान बारीक कापण्यासाठी सुरी चांगली धारदार असायला हवी. धार तपासण्यासाठी अगदी पिकलेला (लिबलिबीत, गिळगिळीत) टमाटा त्या सुरीने कापून बघावा, असे म्हणतात. अगदी सहज, रस न काढता टमाटा कापला गेला पाहिजे. डाव्या हाताच्या बोटांना कांदा पकडला असल्यास डाव्या हाताच्या तर्जनीच्या टोकाला सुरीचे पाते समांतर लावून ठेवायचे. कांदा कापताना बोटाच्या वर सुरी जाता कामा नये. आता पटापट कापून बघा कांदा. नक्की जमेल.
माझ्यामते, मुंबईत भेळ आणि पाणीपुरी चांगली मिळते. भेळेत जी लसणाची
लाल चटणी टाकतात ती जरा मी जास्तच टाकायला सांगतो. पुण्यातही भेळ छान
मिळते. पण फरसाण आणि चिंचगुळाचे पाणी थोडे जास्तच टाकतात. मात्र पुष्करिणीतली भेळ हलकी असते. कोल्हापुरातली
भेळ तर बेस्टच! पाणीपुरीचे म्हणाल तर पुण्यात पाणीपुरीच्या नावाने थट्टा
केली जाते. नागपुरातली भेळेत बटाटा कुस्करून टाकतात. मी तिचा फ्यान नाही.
पण मुंबईप्रमाणेच पाणीपुरी फार उत्तम मिळते. नागपुरात राजस्थानी,
अलाहाबादी, दिल्ली आणि मथुरेची पाणीपुरी उत्तम मिळते. त्यातही 'आलू
टिकिया' बेस्ट. असो. थांबतो. तूर्तास भडंगाचा पुडा फोडायला हवा.