माझ्यामते रोजे न पाळता उलट त्या काळात मद्यपान करणारा गालिब हा खरे तर
जास्त आध्यात्मिक मानला जावा.
वाक्य मजेशीर आहे.
तसा तो बहुधा त्याच्या मृत्यूनंतर मानला
गेला आहे.
तुमच्याशिवाय आणखी कुणी मानले आहे? संदर्भ द्याल का?
त्याने एका विशिष्ट संकल्पनेला ईश्वर न मानता माणुसकीला महत्त्व
दिलेले दिसते.
एखाद्या नेहमीच्या छापील भाषणातले वाक्य वाटते. बहुतेक सर्व मोठ्या कवींना लागू होईल. पण माणुसकीला कसे महत्त्व दिले त्याचे दाखले दिले असते तर बरे झाली असते.
आपण म्हणता तशी मिष्किल शैली सर्वत्र आहेच.
आभारी आहे. हेही नसे थोडके.
परंतु 'खुदाके
वास्ते परदा न काबेसे' या किंवा नक्श फरियादी है किसकी शोखी ए ' सारख्या
शेरांमधून तो भौतिक विचार मांडलेत असे दाखवून कुठल्यातरी गूढ विषयांवर
बोलतो असे माझे मत झाले आहे.
गझलेबद्दलची तुमची काही मते फार चुकीची आहेत, असे माझे स्पष्ट मत झाले आहे. गालिबची कविता प्रश्न विचारणारी आहे, तिला अर्थांचे अनेक पदर आहे. त्यात हुशार वर्डप्ले देखील आहे. त्यामुळे ज्याला शोधायचे आहे त्याला गालिबच्या शेरांतून बरेच काहीतरी गूढ शोधता येते.
नाराज होऊ नयेत अशी इच्छा!
ह्यात वैयक्तिक (पर्सनल) असे काहीच नाही.