.... एक मार्ग असू शकतो. पण म्हणून वाचकाने 'तेवढेच' लक्षात ठेवावे, अनुसरावे  वा 'त्याचे' कुठेही वा सार्वत्रीक उल्लेख करावेत अशी सज्जनांची बोली / देहबोली असते का? 

अहो, ट्टग्याजी वा त्या बुरख्यातले जे कोणी व्यक्तीमत्व असेल [ इथे व्यक्तीनिष्ठ उल्लेख नाही] त्यांनी श्री. विवेकानंदांची "वचने" स्वतः मध्ये भिनवायची का त्यांची "व्यसने" ?

बाकी,   " टू अर्र इज ह्युमन" / " माणूस एक स्खलनशील प्राणी आहे" या अपप्रचाराचे भारतीय नक्कीच " बळी" आहेत असा माझा ठाम विश्वास आहे. अशी स्खलनशीलता तुमच्या वा आप्तांच्या वा स्वकियांच्या बाबतीत जेंव्हा " अतीदक्षता विभागात" येते ना तेंव्हा त्या " छोट्यात छोट्या चूकीची किती मोठी किंमत मोजावी लागते"  याचा अंदाज येत असतो.

जगात लोक "६ सिग्माच्या पलीकडचा" विचार करताहेत अन अपप्रचारी भारतीय " १ सिग्मा" साठी आजन्म धडपडताहेत.

अशा "६ सिग्माच्या पलीकडचे" विचारीजन त्यांना ज्या चूका करावयाच्या असतात त्या ८३,९९,९९९ जन्मांत संपल्या असे ठाममत "जप तात" .

आपल्या चर्चेतून वा वादातून वाचकांचे " प्रबोधनच व्हावे" अशीच तळमळ.

धन्यवाद !