श्वासींधनी सीमा - श्वास हेच इंधन त्याची सीमा.. अच्छा, अच्छा असा समास आहे तर! शब्दसंपदेत  नवी भर!
ह्याच चालीवर "कारींधनी सीमा" = "पेट्रोल संपले आहे", "बाळींधनी सीमा" = "दूध संपले आहे" असे लिहता येईल. असे क्लिष्ट शब्द रचण्याचा आटापिटा अतर्क्य!

पौरुषाचा ऱ्हास... अश्याने त्यातील पौरुषत्व हळू हळू नष्टच व्हायचे!
हे स्पष्टीकरण केवळ अगाध आहे! ये सिर्फ इस कवी की कल्पना का चमत्कार है.

निर्विरोधी गुंतणे - प्रेयसी सुरुवातीला लाजते, नंतर प्रेमाची मागणी स्वीकारते व त्यानंतर बिनविरोध दोन आत्मे एकमेकांमध्ये गुंततात. सुरुवातीला लाजणे, नंतर प्रेमाची मागणी स्वीकारणे ह्यात 'विरोध' कुठे आहे? मग 'बिनविरोध' चा अर्थ काय?

व्यर्थ मैदानात ठरली छंद माधुर्ये तुझी - वास्तव जगात जगताना कवितेच्या मधुर गुणांचा मला कधीही फायदा झाला नाही. उलट साऱ्या जगाने निंदा तरी केली किंवा माझाच फायदा तरी घेतला. तसेच, आयुष्यातील दुःखांशी लढताना नुसत्या कविता सुचून काही बळ आले नाही.  अश्या अर्थाची ही द्विपदी होती.

कवीकडूनच काव्याची निर्घृण वंचना! कुसुमाग्रज, तुमची 'कणा' ही कविता आम्हा अनेकांना नुसती आठवूनही बळ मिळते.इथे कवीला (तुमच्याच काय) स्वतःच्या काव्यानेही काहीही दिले नाही!

कधी कधी 'एक ओळीत सारे मावते' तर 'एक ओळीत सारे (ग)मावते' ही! 

असो, इति लेखनींधनी सीमा.

असंमजस + व्यथित,
जयन्ता५२

जयन्ता५२