लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामध्ये महत्वाचा आहे.

आयुष्यभर सोबत करणारा, हक्काचा, ज्याच्यापाशी आपली सुखे, दु:खे प्रकट करता येतील, इतकेच नव्हे तर वाटुन घेता येतील, असा एक साथीदार मिळवणे हा लग्नामागचा हेतू असावा असे मला वाटते.

लग्न होण्याआधी आपण केवळ आपल्या स्वप्नांचा, ध्येयांचा विचार करत असतो. पण लग्न करताना हा विचार नक्की करावा की लग्नानंतर आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांमध्ये, ध्येयांमध्ये सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. दोघांची स्वप्ने सारखी असतील तर संसार सुखी होण्याची शक्यता जास्त आहे. सारखी नसतील तर दोघांनाही थोडीफार तडजोड स्विकारावी लागेल. अगदीच विरुद्ध स्वप्ने मात्र असू नयेत.

अजुन बरंच काही सांगण्यासारखं आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे लिहीनच.
अमित चितळे