झकास लेख. शिवाजीनगर स्टेशनवरची झटका भेळ, डेक्कनवरची सांगली भेळ, पेठेतली पुष्करिणी भेळ या आधुनिक आठवणी. मात्र गावाकडच्या राधाकिसनची तिखटजाळ भेळ, मयुर हॉटेल, गोकुळ हॉटेल मधल्या चमचमीत भेळी, रविवारच्या बाजारात मिळणारी अजिबात तिखट नसलेली पण चविष्ट भेळ. पुणे नाशिक रस्त्यावरील वाकी बुद्रुकमधील एका टपरीवरची लोकप्रिय भेळ वगैरे भेळी आठवल्या.
गावाकडून कोणी पाहुणे आले की आठवणीने मयुर हॉटेलची भेळ घेऊन येत असत. आठवणीने तोंडात आणि डोळ्यात पाणी आले. :(