भानस, मला जे वाटतंय ते सरळ सरळ सांगतोय त्याबद्दल राग मानू नका. पण माझं असं मत आहे की याच्यापेक्षा चांगलं लिहिण्याची तुमची नक्कीच क्षमता आहे. 'काकू म्हणोनी कोणी' किंवा 'रुमाल' हे तुमचे लेख लक्षात राहिले होते. वरची कथा संपवण्याची घाई केलीत असं वाटतंय. आणखी विस्तार केला असतात तर ही कथा वाचायला बहुतेक जास्त चांगली वाटली असती. बघा पटतंय का...
- मिलिंद