सई ताई भेळ खमंग झाली आहे पण जरा त्यांत शुद्ध लेखनाची सर-मिसळ होऊन जरा आंबट झाली आहे !! लेख पाठविण्याआधी जरा आपल्याच मनोगत ची शुद्ध लेखनं तपास-चटणी लावून आपला लेख किती खमंग झाला आहे ते परत एकदा चाटून पाहावा !!

चणेवाले आणि भेळवाले भय्ये हे आपल्या सर्वांच्याच बालपणातले एक अविभाज्य अंग आहे !! ते मनमे ऐस्या रुज्या है कि कोणी 'मनसे' हाकलवून देवू शकत नाही!! अगदी आजही जेव्हा जेव्हा आपल्या मायदेशी पाय टेकतो तेव्हा सोसायटीत नेहेमी येणाऱ्या भय्याच्या (ही त्याची दुसरी पिढी!) हातची शेवपुरी/भेळ (पानी मारके! ) तर चाखतोच, शिवाय सिटिलाईटच्या भय्याकडे पाणीपुरी / रगडा पेटीस (जीभ रडू लागली की राव ! ) भरपेट ओरपून खाल्ल्याशिवाय भारतभेटी चा उपवास सुटत नाही!