'आदम' या शेरावरून आपला असा ग्रह झालेला दिसत आहे की गालिबला प्रेयसीने हाकलून दिल्याची व्यथा आहे.

एक्झॅक्टली. मला तरी असाच अर्थ वाटतो. म्हणजे अगदी हाकलून वगैरे नाही, पण आपल्या प्रेमिकेच्या घरातून अपमानित होवून बाहेर पडलेल्या प्रेमिकाने आपल्या अवस्थेची तुलना ही स्वर्गातून हकालपट्टी झालेल्या आदमशी केली आहे. ही दोन अपमानांची तुलना आहे. यात मला (तरी) कुठेही परमात्म्याशी संवाद/उपहास जाणवला नाही.

तसेच "खुदा के वास्ते" व "मुहब्बत मे नही है फर्क" यातही उपहास कसा आहे ते सांगावे.

(कृपया असा ग्रह करू नये की तुमचा मुद्दा खोडण्यासाठी मी वाद घालतो आहे. मला खरोखर उत्सुकता आहे.)