Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


२९ एप्रिल १९८८, शुक्रवारची ती संध्याकाळ मला लख्ख आठवतेय….वळवाचा पाउस पडून गेलेला होता….. माझ्या लहान बहिणीला सुप्रियाला त्याच दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला होता. तिच्या अंगातला अशक्तपणा अजुनही गेलेला नव्हता.भर उन्हाळयात पडलेल्या पावसामुळे वातावरण बदललेलं होतं आणि आम्ही सगळी लहान मुलं खेळायला बाहेर पळालेलो होतो.

शेजारच्या बंगल्याचे बांधकाम सुरु होते……बांधकामाचे सामान सगळीकडॆ पडलेले होते……वाळुच्या एका ओल्या ढिगात बोगदे करण्यात आम्ही गुंगलो होतो. एकाने ढिगाच्या एका बाजुने बोगदा करायचा आणि दुसऱ्याने दुसऱ्या बाजुने , ...
पुढे वाचा. : आई म्हणाली, “छान केलसं !!!”