!!! अनामिक !!! येथे हे वाचायला मिळाले:

बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.)

मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची ...
पुढे वाचा. : आठवणींचा पाऊस