माझिया मना जरा सांग ना येथे हे वाचायला मिळाले:
अनिकेतच्या ब्लॉगवरची गेली दोन पोस्ट वाचली आणि मला पण उगाचच जुने दिवस आठवायला लागले. तसं पाहिलं तर फार काही जुनी गोष्ट नाही म्हणा ही पण झालीच की तरी तीन वर्षं. तेव्हाची मी आणि आताची यात जमीन-आसमानचा फरक आहे असं वाटलं. आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी किती छगडावं याला काहीच मर्यादा नव्हती तेव्हा आणि आता, रस्ता पाहून आधीच पळून जावंसं वाटतं. असो. उगाच रडून जुन्या आठवणीतील गंमत घालवायची नाहीये मला. मी विचार करत होते २००६ पासूनच सुरु करावं पण मग मध्येच २००४/५ पण घुसला त्यामुळे त्यांना आधी थारा द्यावा म्हणते. की त्याआधीपासून?....