श्री मयुरेश,
ज्या लोकांच्या पूर्वजांनी स्वतः अस्पृश्यता पाळली त्यांनी एक जात निवडून त्या जातीच्या पूर्वजांनी केलेल्या पापामुळे त्या जातीला सरसकट झोडपले, वाट्टेल ती दूषणे, विशेषणे तयार केली. हे योग्य आहे असे आपल्याला का वाटत आहे?
वेद पुराण निरर्थक नव्हते. त्यात व्यवहारोपयोगी खूप माहिती आहे असे आपणास वाटत असल्यास काही उदाहरणे द्याल का? संताचे कार्य वगैरे हा विषय वेगळा आहे आणि मला त्याचे ज्ञान नाही त्यामुळे मी काही उत्तर देऊ शकत नाही.
ब्राह्मणांनी उत्तम कार्य केले असते तर फुले, आगरकरांची काय गरज होती?
फुले आगरकरांची समाजाने गरजेपोटी निर्मिती केली? हे नवीनच ऐकतो आहे! मी असे कुठेही म्हटले नाही की आपल्या समाजात सगळे आलबेल होते. सगळा समाज एका कर्दमात रुतलेला होता. विचारवंतांनी आपापल्या परीने समाजाला बाहेर काढायचा प्रयत्न केला. फुल्यांचे कित्येक विचार अत्यंत वादग्रस्त वाटतात. पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या. पण कर्वे, आगरकर, चिपळूणकर असे ब्राह्मणही यात सामील होते. सरसकट ब्राह्मणांना झोडपताना हे का विसरतात लोक?