प्रदीपजी,

मनोगतावर पाहिलेल्या काही उत्कृष्ट गजलांपैकी एक ! साधे सोपे, सहजपणे आल्यासारखे वाटणारे तरीही खूप काही सांगून जाणारे शब्द !  नाहीतर लोक उगीचच अवघड शब्द वापरत बसतात.

राग मानू नका पण मला नेहमी येणारी शंका विचारतो.

प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे!

या शेरात मला वाटतं हे संपूर्ण एकच वाक्य (statement) आहे. पहिली ओळ स्वतंत्रपणे पाहिली तर त्याचा अर्थ लागत नाही. आणि माझ्या समजुतीप्रमाणे गजलेमध्ये प्रत्येक ओळीला स्वतंत्र अर्थ असावा लागतो. कृपया शंकानिरसन करा.

तज्ञांच्या मार्गदर्शनाचीही अपेक्षा आहे.

फिनिक्स