"रागांच्या माळेतला हा 'कंस' म्हणजे श्रेष्ठतर..."
मालकंस श्रेष्ठतर आहे यात वाद नाही. पण 'कंस' म्हणजे श्रेष्ठतर हे तितकसं योग्य वाटत नाही. हे कोष चं अपभ्रंशित रुप असावं असं वाटतं. कारण पारंपारिकरित्या मालकंसला मालकोष किंवा मालव कौशिक सुद्धा म्हणतात. यातील तज्ञ मंडळी यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
लिखाण आवडले. पु. ले. शु. !
अवांतर : आणखी एक मालकंसातलं प्रसिद्ध हिंदी गाणं म्हणजे 'आधा है चंद्रमा, रात आधी...'