अप्रतिम....!
का कुणास ठाऊक, पण तुमच्या इतक्यातल्या सगळ्या कविता वाचूनही, 'खरी प्रदीप कुलकर्णीची कविता' अशी कुठली जाणवली नव्हती. कुठे तरी काही तरी कमी असल्याचं, निदान मला तरी जाणवत होतं.
पण ही गझल... आहाहा! खरोखर सुंदर! शेवटचे तीनही शेर म्हणजे एकदम 'खल्लास'! खालचा शेर विशेष आवडला!
माझे न कधी कळणार कुणाला गाणे...
मी मौन स्वरांनी गात निघालो आहे!
शुभेच्छा. असेच लिहीत राहा!