सुरेल लेख. मला माझ्याच 'न आकळलेले' संगीत श्रवण आठवले.
आयपॉड नसता तर वगैरेतील भावनांशी पूर्ण सहमत. गाणं न ऐकता काम करण्याचा गेले पंधरा दिवस प्रयत्न करतोय. फसतोय.
अदिती म्हणतात तसंच रागांच्या प्रहरांशी असलेल्या नात्याबाबत माझाही अनुभव आहे. अनुभव म्हणण्याइतकं खरं तर मला संगीत कळतच नाही. कोणत्याही वेळी कोणताही राग ऐकतो. माझा भर वाद्यसंगीत ऐकण्याकडंच जास्ती.