केशवसुमार, खोडसाळ, राजे विडंबनश्री, चैतन्य यांच्या कविता विडंबन आहेत हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा?
त्यांचा की वाचकांचा?

माझ्यामते तरी हे विडंबनच आहे. (काही चुकांसहित) ज्यांना हे विडंबन वाटत नाही त्यांनी अधिक स्पष्ट करावे. माझ्याही एका कवितेवर विडंबन केले गेले आहे. मला काहीच प्रोब्लेम नाही.

मला आवडलेल्या ओळी.

व्यासंगावाचून सफाईने जमवी
कुठल्याही विषयात टुकारांची गर्दी

वाटावे ओठांस कुणाच्या, काहीही
गालांवर माझ्याच नकारांची गर्दी

ही आहे तुंबून किती वर्षे येथे-
ना मेंदू,  गुडघ्यात विचारांची गर्दी     हे फारच आवडले.

मात्र....
गुरुजींच्या नावावर शिष्यांना मिळते
मरतुकड्या कवितेवर हारांची गर्दी     - या ओळी विडंबनाच्या वाटत नाहीत. तरी अधिकार तुमचाच.

का दाटे काहूर मनी या प्रश्नाचे...
'का होई रक्तात विकारांची गर्दी? '   या मूळ ओळी आहेत. (केवळ माहितीसाठी)

आणि...

स्वारांची नसते, न हुशारांची गर्दी
बाजूने माझ्याच पुळचटांची गर्दी       हे चुकलेले आहे. तंत्राच्या दृष्टीने. अर्थात, तंत्राचेही विडंबन होत असेल तर माझी माघार.

तरीही हे विडंबन म्हणता येईल.