ही गझल नाही. केवळ रदीफ, काफिया घेतले म्हणून गझल होते का? की वरती गझल लिहिले म्हणून होते?
माझ्या मते ही एक चांगली (उत्तम नव्हे) कविता म्हणता येईल. यात एक-दोन शेरही मिळतील. पण बाकी कविताच आहे.
संपून तरी जाईन तिथे मी, किंवा -
-होईल नवी सुरुवात... निघालो आहे! - हा शेर छानच.
रंगेल सुखांचा छान विडा रंगावा...
घेऊन व्यथांचा कात निघालो आहे! - ही कल्पना छान.
पकडून उन्हाचा हात... निघालो आहे!
भेटेल मलाही रात... निघालो आहे!
प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे! - या ओळी अगदीच साध्या. पुण्यात किमान ४००० कवी अशा ओळी लिहित असतील.
अर्थात, हे माझे मत झाले. कवीच्या दृष्टीने ही गझल असेल तर गझल. मला काय? मी मला वाटले ते लिहिले आहे. कोणी वैयक्तिक घेऊ नये ही विनंती.