तसेच तात्कालीक फायदा की दिर्घकालीन हित? अशा एक ना अनेक द्विधा मनस्थितीत मनुष्यप्राणी असतो. निर्णय सखोल विचाराअंती घ्यावा. पण निर्णयाची अंमलबजावणी करताना मात्र ती समर्थक वा विरोधक अशी फाळणी करून झाली तर मग आपण जसे आचरण करतो आहोत तसेच जर आपल्या पोटच्या अपत्याने आपल्याशी तेवढ्याच तीव्रतेने केले तर आपल्याला कसे वाटेल? असे तारतम्य / स्वानुभूती बाळगून करावी. मग समर्थक / विरोधकांचे तराजू आज ना उद्या डोलत राहणार. कधी तुमच्या बाजूने कधी विरुद्ध बाजूने.
आपण दिलेले घाव, आपण स्वतः सुद्धा व्याजासकट झेलावेत हेच न्यायसंगत असेल नाही का?
करावे तसे भरावे. हाच निसर्गनियम.
दुसऱ्यांच्या दया / क्षमा / शांती / अक्षमता यांचा दुरुपयोग करून अत्त्याचार करताना असे अत्त्याचारी, आपल्या मुलांवर, नातवांवर परतफेडीची आपत्ती ओढवत असतात.
धन्यवाद.