आपली संतती म्हणजे आपल्या अधिपत्त्याखालील संपत्ती हे विचार अजूनही आपल्या समाजातून गेलेले नाहीत. हळुहळू जातील.
मर्फीच्या नियमांवर आधारित काही नियमांबद्दल एक पुस्तक फारा वर्षांपूर्वी वाचनात आले होते, त्यातला एक नियम आणि त्याची उपप्रमेये या निमित्ताने आठवली.
१. इफ यू वेट फॉर लाँग इनफ, इट विल गो अवे... (पुष्कळ वेळ वाट पाहिलीत तर ते - जे काही तुम्हाला त्रास देत असेल ते, आपोआप - निघून जाईल...)
२. ...हॅविंग डन इट्स डॅमेज. (...पण तुमचे जे काही नुकसान करायचे असेल, ते करून झाल्यावर मगच.)
३. इफ इट वॉज़ बॅड, इट विल बी बॅक. (ते जे काही होते ते जर खरोखरच इतके वाईट असेल, तर ते तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल.)