पुढील आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा व अभिनंदन!! सगळे डोक्यातून काढून टाका व उत्सव साजरा करा.
विवेक, शाहिस्तेखान, केवाका ह्यांच्याशी सहमत. ' काळ ' हाच सर्व जखमांवरचा इलाज आहे.
घाव बोथट होतात पण भरत नक्की नाहीत. म्हणूनच तर म्हणतात ना बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करावा.
मागे वळून पाहताना कदाचित कसे वागलो म्हणून हसूही येईल परंतु सोनेरी क्षणांना लागलेले गालबोट पुसले जाणार नाही. मात्र त्या घावांना त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला तुम्ही नक्कीच शिकाल व तेच योग्य आहे.
टग्याने नमूद केलेल्या नियमांमधील कटू सत्यता आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवली आहेच जीवनात.