कृतीचे वर्णन छान आणि मार्गदर्शन उपयुक्त आहे. हुबेहूब चित्रे डोळ्यांसमोर उभी राहिली.
काही शंका:
१. भेळ बनवताना ती 'एचटीटीपी://रोहिणीविनायक.ब्लॉगस्पॉट.कॉम/' ही पांढऱ्या रंगातील अक्षरे भेळेवर (आणि त्याआधी भेळेच्या कच्च्या मालावर) नेमकी कशी काढावीत? (विशेषतः त्या चिंचगुळाच्या दाट पाण्याच्या वाटीवर, बहुतांशी चिंचेच्या पाण्यावर तरंगतील परंतु काही थोडी वाटीबाहेर ओसंडून हवेत अधांतरी राहतील अशा बेताने. पुष्करिणी भेळवालासुद्धा अशीच काढतो काय?)
२. ती अक्षरे काढण्यासाठी नेमके काय वापरावे?
३. 'एचटीटीपी://रोहिणीविनायक.ब्लॉगस्पॉट.कॉम/' असेच लिहिणे अनिवार्य आहे, की त्याऐवजी 'भारत माता की जय।' असे जर एखाद्याला लिहावेसे वाटले किंवा 'हम दो हमारे दो' किंवा 'बाटलीने बाटला, तो संसारातून उठला' यांसारखा एखादा राष्ट्रसंदेश लिहून थोडे समाजप्रबोधन* करावेसे वाटले, तर तेही चालू शकेल? (पुष्करिणी भेळवाला 'एचटीटीपी://रोहिणीविनायक.ब्लॉगस्पॉट.कॉम/' असेच लिहितो काय?)
*'भेळेद्वारे समाजप्रबोधन' ही कल्पना वाईट नाही. किंबहुना याच कल्पनेचे व्यापारी तत्त्वांवर थोडे विकसन केले, तर 'भेळेचा हा भाग अमूकअमूक कंपनीद्वारा प्रायोजित' अशा प्रकारचे मजकूर किंवा कंपन्यांच्या जाहिराती संबंधित कंपन्यांकडून आगाऊ पैसे घेऊन स्वीकारायला हरकत नसावी. भरपूर पैसा बनवावयास वाव आहे.