एकदा सर्व नाती ही काल्पनिक आहेत हे पटले तर हा त्रास लगेच संपेल. प्रत्येक प्रसंगाचे आपले विश्लेशण हे आपल्यावर त्याचा काय परिणाम होणार या दृष्टीकोनातून असते. जर तुम्ही तुमच्या निर्णयाची पूर्ण जवाबदारी घेतली तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. पण पूर्ण जवाबदारी म्हणजे पूर्ण जवाबदारी! जोपर्यंत आपला दुसऱ्याला दुखवण्याचा हेतूच नाही तोपर्यंत त्याच्या गैरसमजाची जवाबदारी सर्वस्वी त्या व्यक्तीवरच असते.

आता   '... पण त्यांनी आधी बोललेल्या... ' हा शुद्ध, स्वतःला कायमचे दुखः देणारा विचार आहे. जर तुम्ही स्वतःच्या सुखाची जवाबदारी घेतली नाही तर प्रसंग काहीही घडो,  तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही.

अगदी! सहमत!!!