आयुष्यात अनेकदा अप्रिय निर्णय घेणे प्राप्त असते. अशी वेळ आल्यास नंतर त्यावर विचार करत बसू नये.
नंतर विचार करत बसल्याने फक्त आपल्यालाच त्रास होणे एवढेच साध्य होते. इतरांवर त्याने काडीचाही फरक पडत नाही किंवा परिस्थितीतही त्याने काहीही बदल होत नाही.
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' यामधूनसुद्धा बहुधा हेच सुचवायचे असावे. (पुढील 'मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगोस्त्वकर्मणि' हा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. )
शुभेच्छा!