जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब हा एकमात्र आरोपी जीवंत पक़ण्यात आला. सध्या त्याच्या विरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कसाबविषयी प्रचंड संताप आणि चीड आहे. मुळात कसाबविरुद्ध खटलाच न चालवता त्याला फाशी द्यावे अशी सार्वत्रिक भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. परंतु भारतीय न्यायप्रक्रिया आणि दंडविधानानुसार कसाबला वकील देऊन हा खटला चालवणे आवश्यक आहे. कारण तसे केले नाही तर त्याला शिक्षा सुनावता येणार नाही. कसाबचे हे कृत्य देशविघातक, देशाची युद्ध पुकारणे अशा प्रकारचे आहे, तर मग त्याला सर्वसाधारणपणे ...