आपण दिलेली आकडेवारी फजूल आहे, हे मी, पुलस्ती किंवा अन्य कोणी परत सांगायची गरजच नाही. त्यातून त्यानंतरचे माझे विधान म्हणजे मी स्वतःचे (आकडेवारी निरर्थक असल्याचे) म्हणणे खोडून काढत आहे, असे समजणे म्हणजे तुम्हाला त्या विधानातला मतितार्थ समजलाच नाही, असे समजून मी सोडून देत आहे.

कल्पनानाविन्य, शेरांचा/ओळींचा सपाटपणा, लहजा अथवा बोलकेपणा, प्रत्येक शेराचे स्वतंत्र कविता म्हणून अस्तित्त्व आणि शेराच्या दोन ओळींची घट्ट वीण इ. बद्दल चर्चा होणे समजू शकतो. त्यावेळी वरील सर्व व इतर काही मुद्द्यांना धरून चर्चा होत असते आणि मग सर्व मुद्द्यांवर फसलेली 'कविता' 'गझल' न उरता निव्वळ कविता उरते. सपाट विधान, कल्पनानाविन्याचा अभाव, बालगीतातल्यासारखी वाटणारी ओळ अशा एखाददुसऱ्या निकषांवर एखादी कविता गझल आहे किंवा नाही, हे ठरवणे मूर्खपणाचे आहे.

आपल्या मते गझल म्हणजे काय व ही कविता गझल का नि कशी नाही, या मूळ प्रश्नाला आपण सोईस्करपणे (किंवा जाणीवपूर्वक) बगल देत आहात, याचे वाईट वाटते आहे.

धन्यवाद नि शुभेच्छा!