आपल्या दोघांच्याही मते गज़ल हा सर्वोच्च दर्जाचा काव्यप्रकार असून कविता हा सामान्य प्रकार आहे असे वाटते. भूषण यांनी तर कारणेही दिली आहेत.

गजलेमध्ये आशयातील व्यवहारीपणा व कल्पनाविलासाचे बेमालुम मिश्रण, रुपके/प्रतिमा/उपमा यांचा खुबीने वापर, कलाटणी, नाट्यमयता, भावनांची तीव्रता, हळुवारपणा, संवादात्मकता, व्यथा, प्रेम, भावनांचा उल्लेख यातील अनेक गोष्टी एकाच वेळेत विविध प्रमाणात उपस्थित असतात. कवितेमध्ये हे सारे 'अनावश्यक' असते. असले तर ठीक, पण नसले तरी निसर्गवर्णनाच्या कविता वगैरे टिकून राहतात.

आपल्या दोघांच्याही मते फसलेली गज़ल ही चांगली कविता असू शकते गज़ल नाही. म्हणजे शंकराचार्यांचे वाक्य बदलून म्हणायचे तर "कुकविता जायेत् क्वचिदपि कुगज़ल न भवति" असे आहे काय?

माझ्या मते गजलेच्या तांत्रिक बाजूंची पूर्तता करणारी रचना म्हणजे गज़ल. तसेच कविता काय गज़ला काय दोघांतही चांगले वाईट असतेच. म्हणून वाईट गज़ल ही चांगली कविता होऊ शकते असे म्हणणे हे गज़ला न लिहिणाऱ्या समस्त कवींचा अपमान करणे आहे. तसेच  उद्या एखादा गज़ला न लिहिणारा कवी वाईट कविता ही चांगली गज़ल होऊ शकेल कविता नाही असे म्हणाला तरी तो गज़लाकारांचा अपमान ठरेल आणि त्यालाही माझा विरोध राहील.

असो. मी कवी/गज़लाकार कोणीच नाही इतकेच काय चारोळीकारही नाही. पण जे खटकले ते सांगितल्यावाचून राहवले नाही म्हणून लिहिले.

विनायक 

(विषयांतर व/वा व्यक्तिगत रोख/संदर्भ वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)