श्री. भोमे,

ठाकूरच्या पदरची 'ती' माणसे म्हणजे भुरटे गुंड असतात. गब्बरसिंगला पकडणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नोहे हे ठाकूर जाणून असतो. त्यामुळे तो जय आणि विरू या हुशार आणि प्रामाणिक जोडीला (त्यांनी जेल मध्ये जाण्याचा धोका पत्करून बेशुद्ध ठाकूरला हॉस्पिटलला पोहोचविले असते) ठाकूर या कामासाठी निवडतो. फक्त, वयोमानानुसार यांच्या बाहूंना वाळवी तर लागली नाही हे पडताळून पाहण्यासाठी या ( आणि इतक्या) भुरट्यांची व्यवस्था करतो. आणि ते इतके गुंड सुद्धा, फक्त दोन निशस्त्रांशी, दोन हात करू शकत नाहीत, तिथेच त्यांची योग्यता कळते. ते काय सशस्त्र गब्बरला 'जिवंत' पकडणार?