राजवी,

असे धाडसी निर्णय घ्यायच्या वेळी मनाची अशी द्विधा स्थिती होणे साहजिक आहे.

परंतु, जर तुमच्या जोडीदारावर आणि तुमच्या निर्णयाच्या योग्यतेवर (यात घरच्यांशी दुरावलेले संबंध ग्राह्य धरलेले नाहीत) पूर्ण विश्वास असेल तर हे आपण हा निर्णय घेण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. उगाच जेवढा जास्त विचार कराल तेवढे गोष्टीला फाटे फुटतात आणि आपलं मन आपल्याला खातं.

इतर मनोगतींप्रमाणे मलाही वाटतं की मनावरच्या जखमांसाठी काळ हे उत्तम औषध आहे, भविष्यात जर कोणी सर्व राग बाजूला ठेवून जवळ आलेत तर तुम्हीही सर्व विसरून मोठ्या मनाने त्यांचे स्वागत करणेच उचित ठरेल.

संजय क्षीरसागर यांच्या "जर तुम्ही स्वतःच्या सुखाची जवाबदारी घेतली नाही तर प्रसंग काहीही घडो, तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही."  वाक्याशी पूर्णपणे सहमत!

आपल्या सुखी भविष्याकरता अनेक शुभेच्छा!!