मिलिंदराव,
चांगले चांगले शेर दिलेत. परत वाचून मजा आली.
मात्रः एक फरक आहे. आपण दिलेल्या प्रत्येक शेरातील पहिली ओळ परिपूर्ण आहे. दुसरीही ओळ परिपूर्ण आहे. प्रदीप कुलकर्णींच्या शेरातील दोन्ही ओळीही स्वतंत्रच आहेत.
पहाः
जिसको सब बेवफा समझते हो
बेवफाई उसीसे मुष्किल है ( जिला / ज्याला सगळे निष्ठाहीन समजतात... ही पहिली ओळ... ही अर्थासाठी दुसऱ्या ओळीवर अवलंबून नाही. 'जिला सगळे असे असे समजतात' हे एक परीपूर्ण विधान आहे. तिच्याशीच निष्ठाहीनपणे वागणे शक्य होत नाही. हे दुसरे विधान सुद्धा परीपूर्ण आहे. दोन्ही विधाने वेगवेगळी वाचून पाहिल्यास ते जाणवते. म्हणजेः पहिल्या विधानानंतर ' तिचे काय? ' असा प्रश्न जरूर मनात येईल, पण विधानच अर्धवट आहे असे वाटणार नाही. )
असेच आपण दिलेल्या सर्व शेरांचे आहे.
याचप्रमाणे, प्रदीप कुलकर्णींच्या शेरातील ओळीही स्वतंत्रच आहेत.
प्रत्येक समुद्रातील परीला 'काय' द्याया असा प्रश्न पडणे हे शक्य आहे, पण त्याचा अर्थ ते विधान अर्थहीन आहे किंवा अर्थासाठीच दुसऱ्या ओळीवर अवलंबून आहे असे नाही.
पहिली ओळ अर्थासाठीच दुसऱ्या ओळीवर अवलंबून असण्याचे एक उदाहरण देतो.
श्री जयंतरावांचा हा शेर आहेः ( अर्थातच, ते ज्येष्ठ गजलकार आहेतच, हे उदाहरण त्यांना दुखावण्यासाठी नसून, खरे तर त्यांनीही मान्य केलेले उदाहरण आहे. त्यांची आधीच माफी मागतो. अगदी सरळ चर्चेत उपलब्ध असल्याने हे उदाहरण घेतले एवढेच! मी त्यांच्या गजलांचा चाहता आहे.)
त्यांचा हा शेरः
दे दुःख, आसवांची
नाही ददात काही
इथे, 'दे दुःख' नंतर 'आसवांची' हा शब्द ऐकायला अयोग्य वाटतो. तसेच, 'आसवांची काय? ' असा प्रश्न मनात येतो. 'नाही ददात काही' असे ऐकल्यावर उलगडा होतो.
मात्र, आपल्यामुळे पुन्हा एकदा ते शेर वाचनात आले याबद्दल आपला आभारी आहे.
धन्यवाद!