शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:

वर्षभर केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेवर लिहीत असताना समोर उगीचच हवा करत बसलेला ’सुपरवायझर’ हा प्राणी मी अनेकवेळा बघितला. पण हा रोल मला करायला लागेल अशी सुतराम कल्पना मला तेव्हा नसली पाहिजे. बॉयफ़्रेंडबरोबर त्याची उगाचच पाचकळ बडबड करणारी बहीण कशी गळ्यात पाडून घ्यावी लागते तशीच आर्थिक स्वावलंबनासाठी पत्करलेल्या या नोकरीबरोबर हे सुपरवायझरगिरीचंही झेंगट माझ्या गळ्यात पडलं.

मे-जून हे आम्हा इंजिनीयरींगवाल्यांचे परीक्षांचे दिवस. बाकीचे जग जेव्हा सुट्टीवर असतं तेव्हा आम्ही पेपर वाटत तरी असतो किंवा तपासत तरी असतो.मुलांना शिकवणं हा एक इंट्रेस्टींग ...
पुढे वाचा. : माझी सुपरवायझरगिरी!